Monday, December 7, 2009


आयुष्यात काही क्षण वेगळे आसतात. लौकिक अर्थाने ते महत्त्वाचे नसतीलही पण त्यांच्या असण्याने आयुष्याला अर्थ येतो. जगण्याचं, मोठं होण्याचं बळ मिळतं.

असे क्षण थोरांच्या चरित्रात नोंदवले जात नाहीत. असे क्षण सिनेमात दिसत नाहीत. पण अशा क्षणाक्षणांनीच आयुष्य घडत जातं.


असे क्षण सांगून येत नाहीत. तिथी-तारखांना ते जुमानत नाहीत. पण जाताना नवा जन्म देउन जातात. आपल्याही नकळत!

वेदना आणि फ़सवणुकींनी उसवलेल्या आयुष्याला अशाच जन्मप्रामाणिक क्षणांच्या टाक्यांनी बांधून ठेवलेलं असतं.अशा अगणित क्षणांची भेट मला दिली आहेस तू. हसर्‍या, रडव्या, चिडक्या आणि हळव्या.
त्या सार्‍या क्षणांना आणि ते देणार्‍या तुला. आजचा हा क्षण. माझ्याकडून अर्पण....