Sunday, September 27, 2009

बॉलीवूडगिरी - भाग ३

प्रसंग १

शोधताहेत सगळीकडे. शोधूदे. शेवटी येतील परत. मग होईलच सामना. बस्स झालं आता लाज सोडून जगणं. खूप सहन केला अन्याय. आता नाही. खरंतर...

अन्याय सहन करायचा नाही म्हणून बसलोय का मी इथे? विडी ओढत, पीटर आणि त्याच्या गुंडांची वाट बघत? पण मला खरंच काही देणंघेणं आहे का त्या हमालाशी जो गेल्या आठवड्यात गाडीखाली येवून मेला?

रक्त सळसळतंय धमन्यांतलं. माझ्या हातावर असलं काही गोंदवताना यांना लाज कशी नाही वाटली? लहान होतो म्हणून. नाहीतर तेव्हाच दोन हात केले असते.

साठून राहिलाय सगळा संताप. अपमान. भूक. बाकीचे वाकतात. मी नाही वाकणार. आज मरेन नाहीतर मारेन. असंही मरायचंच आहे. जीव लवकर गेला काय आणि उशीरा गेला काय. पण आता भूक मारायची नाही. आता फ़ाटके कपडे घालायचे नाहीत. सगळं हवं नाहीतर काहीच नको. अगदी आयुष्य सुद्धा आणि निर्णय आत्ता व्हायला हवा. आता हटलो तर परत पाऊल पुढे पडणार नाही. जे व्हायचंय ते आत्ताच होऊन जाउ दे!

’कसा सापडत नाही? शोधा त्याला सगळीकडे!’

विडीचा एक बेदरकार झुरका आणि शब्द,
"पीटर"...
"तुम लोग मुझे बाहर ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहॉं इंतजार कर रहा हू"


प्रसंग २

मिळालं की सगळं. अगदी सगळं नाही तरी या पुलाखाली बसून उपाशीपोटी जी स्वप्नं बघितली होती ती झाली सगळी साकार. जिंकलो शेवटी आयुष्याच्या जुगारात. साली हरामी दुनीया! सरळ चाललं की उपाशी मारते. हिला फ़ाट्यावर मारूनच जगावं लागतं. कसली मूल्यं आणि कसले आदर्श..
इथे सत्य एकच. पैसा बोलतो!

याला कितीदा समजावलं. कसल्या खुळचट समजूती घेऊन जगतोय कुणास ठावूक? इथे प्रेमाला प्रेम आणि चांगल्याला चांगलं भेटलंय का कधी? काय मिळतं प्रामाणिकपणे जगून? आपल्या बापाची जी गत झाली तीच तुझी पण करतील. तुझ्या बायकोला पण अशीच घमेली उचलावी लागतील आणि लोकांच्या घाणेरड्या नजरांना तोंड देत रस्त्याच्या बाजूला दोन पोरांना घेऊन संसार थाटावा लागेल. मग येईल अक्कल तुला.

बघ माझ्याकडे. तो फ़ाटक्या कपड्यांचा आणि फ़ाटक्या नशिबाचा जहाजावरचा हमाल कुठे आणि आजचा मी कुठे. आणि फ़सवणूक कुठे नाहीये? मी फ़क्त ती छातीठोकपणे करतो. तुझ्या सहकार्‍यांसारखी ’टेबलाखालून’ जमत नाही मला.
सगळं तर आहे माझ्याकडे. बंगला, गाडी, पैसा, नोकरचाकर. तुझ्याकडे काय आहे? काय फ़ळ मिळालं तुला तुझ्या प्रामाणिकपणाचं? कशासाठी करतो आहेस हे सगळं? आहे उत्तर?

’मेरे पास माँ हैं’



Monday, September 21, 2009

चहा

रोजच्या सवयीने त्याला जाग आली. घड्याळात पाहिलं. पहाटेचे साडे पाच वाजले होते. कूस वळवून बघण्याची गरज त्याला भासली नाही. तिची उब, तिचा वास तिच्या अस्तित्त्वाची साक्ष देत होते.

तो सावकाश उठला. बेसीनपाशी गेला. कुठल्याशा पांढर्‍या मंजनाने दात घासले. चूळ भरली. तोंड धुवून स्वयंपाकघरात आला. गॅसवर भांडं ठेवलं. पाणी ओतलं.
पाणी. स्वच्छ, थोडंसं गोडसर, रंगरहित पाणी. त्याच्या लहानपणासारखं. त्याला आठवलं बालपण. नोकरदार वडिल, प्रेमळ आई, मध्यमवर्गीय घर. मध्यमवर्गीयच स्वप्नं, आशा, आकांक्षा....

’साखरेचा डबा कुठं गेला बरं?’ तो स्वत:शीच पुटपुटला. बरीच शोधाशोध केल्यावर सापडला.
आजकाल असंच होतं. साध्या साध्या गोष्टींत स्मरणशक्ती दगा देऊ लागली आहे. पण पूर्वीचं सारं मात्र लख्ख आठवतंय.
डबा उघडून त्याने पाण्यात साखर टाकली. बघता बघता ती पाण्यात विरघळून गेली. शुभ्र, गोड, अर्धपारदर्शक. जणू पहिल्या भेटीतली ती. तीही अशीच आली आणि विरघळून गेला तो तिच्यात. पूर्वी कधी अनुभवला होता असा नात्यातला गोडवा? जग इतकं सुंदर आहे हे त्याआधी कुणी त्याला सांगूनही खरं वाटलं नव्हतं.

उकळत्या पाण्याच्या आवाजाने तो भानावर आला. गडबडीने त्याने चहा पावडरीचा डबा उघडला. त्या काळ्याकुट्ट, सुकलेल्या पानांकडे बघितलं की कसंसच व्हायचं त्याला. ती काळी रात्र आठवायची. तिच्या जाण्याची रात्र. कितीक प्रयत्न करूनही विसरली न जाणारी रात्र. नंतरच्या अगणित रात्री जागवत ठेवणारी रात्र.
ते नकोसे विचार आणि त्या आठवणी झटकत त्याने दोन चमचे पावडर पाण्यात टाकली. पाणी काळवंडलं. हळू हळू लाल होत गेलं. काळसर लाल, तामसी लाल, मॉरडॉरच्या त्या ज्वालामुखीच्या रंगाचं लाल.

कितीक वर्षं तो त्रास भोगला होता, जगला होता. ’ती नाही तर कुणीच नाही’ या हट्टाला सारं आयुष्य वाहून टाकलं होतं. बरोबरीचे सारे लेकुरवाळे झाले. तो तसाच राहिला. आतल्या आत आक्रोशत, जळत. वेळ पुढे जात नव्हता त्याच्यासाठी. त्या रात्री ती कालचक्रच जणू थांबवून निघून गेली होती.

पाणी उकळत चाललं होतं. संताप आणि वेदनेच्या लालजर्द उकळ्या फ़ुटत होत्या त्याला.

"अहो लक्ष कुठंय तुमचं? उकळला की चहा", अचानक कानावर पडलेल्या आवाजाने तो भानावर आला.
समोर पाहतो तर काय, त्या उकळत्या पाण्यात ती थंडगार, दाटसर दूध घालत होती. जसं जसं ते दूध त्या चहाला भेटत गेलं, त्या उकळ्या थांबल्या. चहाचा रंग पालटला. मघाच्या तामसी लालपणाची जागा आता वयाने येण्यार्‍या स्निग्धतेच्या आणि सामंजस्याच्या केशरी पांढर्‍या रंगाने घेतली होती.
"उकळत्या चहाच्या पाण्यात दूध घातल्याशिवाय चहाला बिलकूल चव येत नाही". ती स्वगत बोलल्यासारखी पुटपुटली.

’खरंय तुझं प्रिये. तू गेलीच नसतीस आयुष्यातून तर गृहित धरलं असतं मी तुला. विसरून गेलो असतो कालांतराने तुझं माझ्या आयुष्यातलं महत्त्व. तू गेलीस आणि मग बर्‍याच वर्षांनी मी तडफ़डून मरेन असं वाटत असताना परत आलीस. मी नाही विचारलं, इतकी वर्षं कुठे होतीस ते. तुझ्या मायेसाठी असुसलेल्या मला काय पडली होती तुझ्या मधल्या वर्षांची? उकळत्या पाण्याने थंड दुधाला उराउरी भेटावं. तरच त्याचा दाह शमतो. त्याच्या अस्तित्त्वाला अर्थ येतो. दुधाच्या उशीरा येण्याचा जाब विचारायचा ना त्याला हक्क असावा ना असावी इच्छा’

"चहा घेताय ना?", तिने सुरकुतल्या हातांनी त्याला बशी दिली. त्याने थरथरत ती ओठाला लावली. पहिला घोट घेतला. क्षणिक मिटलेले डोळे उघडले.

खिडकीतून येणार्‍या पहिल्या सूर्यकिरणांनी तिचा चेहरा उजळला होता. तिचे पांढरे केस त्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. या सगळ्याचा अर्थ लावता लावता अखेर ती जाणिव त्याला येऊन भिडली.

जग पुन्हा सुंदर झालं होतं....

Thursday, September 17, 2009

प्रिय

प्रिये,

देवघरातली फ़ुलवात पाहिली आहेस का कधी? समईत तेवणारी,मंद प्रकाश देणारी, वार्‍याच्या झुळकेसरशी लवलवणारी आणि हळुच समईच्या तेलाची स्निग्धता देवांच्या चेहर्‍यावर आणणारी.

लहानपणी खूपदा झालंय असं. संध्याकाळी समई लावून, उदबत्ती लावून, शुभंकरोती म्हणून मग दिवे मालवून त्या मिणमिणत्या प्रकाशाकडे एकटक पहायचो.

कसल्या कसल्या खुळचट कल्पना असायच्या डोक्यात. तेल संपायच्या आधी समई शांतावली तर काहीतरी अशुभ घडेल वगैरे. चुकून कधी असं झालंच तर पुन्हा समई लावेपर्यंत जीव घाबरा होवून जायचा.
त्यात जर बाबा यायचे असतील घरी तर मग अजूनच त्यांच्या वाटेकडे डोळे लागायचे. आईला प्रश्नच पडायचा की आज आपला लेक एवढी कशी काय वाट बघतोय बाबाची? मी नाही सांगायचो तिला. मग गेटचा आवाज ऎकू आला की जीव भांड्यात पडायचा.

तुला माहितीये, आमच्याकडे गणपतीत गौरी पण असतात. त्या बसल्या की दोन मोठ्ठाल्या समया रात्रभर तेवत ठेवण्याची प्रथा आहे. गौरी जेवायच्या दिवशी रात्री हळदी कुंकू झाल्यावर आई न चुकता म्हणायची ’चेहरा पडला हो दोघी माहेरवाशिणींचा, उद्या परत सासरी जायचं म्हणून’.
मग मलाही उगाचच ते शाडूचे डोळे उदास झाल्यासारखे वाटायचे. काल रात्रीचा तो प्रसन्न प्रकाश आज रात्री भेसूर होवून जायचा...

आजकाल नको वाटतं असं समईसारखं जिणं. शांत, मंद, समंजस. आप्तेष्टांच्या स्निगधतेवर स्वत:ची ज्योत किती दिवस तेवत ठेवायची?

वाटतं, कापूर व्हावं. खडबडीत का असेना, पण पारदर्शक व्हावं.
कुणाला आपला त्रास नको अन आपण जळताना इतरांवर उपकार केल्याचा फ़सवा आभास नको.
रोज रोज जगणं मरणं नको आणि न मिळणार्‍या गोष्टीसाठी झुरणं नको.
एकदाच जळावं. स्वत:तून, स्वत:साठी, पेटून उठावं.
स्वच्छ,शुभ्र उजेड असावा,कसलाही भास नसावा.
हवं तर बाहेर पडणार्‍या त्या काळ्या धुरालाही कवेत घ्यावं.
जळावं, जळत जावं, मग मागे काहीच उरू नये. न राख ना निखारा.
उरलीच तर उरावी कापूरपात्राच्या तळाशी थोडीशी काजळी.

प्रिये, मी जेव्हा असाच काप्रागत जळेन तेव्हा ती काजळी तळपायाला लावून घेशील? की डोळ्यात घालशील? की धुवून टाकशील तो काळा डाग तुझ्या स्वच्छ गतायुष्यावरून???

Wednesday, September 9, 2009

When You Are Old

W. B. Yeats या कवीची ही कविता खूपच आवडली म्हणून हिंदीत अनुवादित करण्याचा हा क्षीण प्रयत्न.


जब भूरे होंगे ये बाल और थक जाओगी तुम
आग के सामने बैठके ये किताब पढो और याद करो

उन आखोंकी मासूमीयत और वो गहरी परछाईया
न जाने कितने दीवाने थे तुम्हारी अदा के
कितनोंको सच्ची झूठी चाह थी तुम्हारी खूबसूरतीकी

बस वो एक था जिसने चाहा तुम्हारी रूह को
और झुर्रियाँ पडते चेहरे के पीछे छुपे दर्द को

उजाले में रोशन हुई सलाखोंके पास बैठकर
उदासी से गुफ़्क्तगू करो, उसे याद करो

जो बिछड गया है प्यार और अब
जा बैठा है परबतोंके उपर, तारोंमें अपना चेहरा छुपाए

Tuesday, September 1, 2009

बस तेरी जिंदगी से...

ढलता मेरा सूरज हैं दुनिया मेरी जलती हैं
तू हरजाई नही हैं, ये इश्क तो मेरी गलती हैं

बिखरे मेरे आशियानेको इक आखरी मझार दे
बस तेरी जिंदगी से इक दिन उधार दे


पूछो न मुझे उस एक दिन को लेके मैं क्या करूंगा
बरसोंसे मर रहा हूं, बरसों मरता रहूंगा

सातों जनम को जी लू, तू पल वो चार दे
बस तेरी जिंदगी से इक दिन उधार दे


किसी और से करूं इश्क ये मुमकीन ही अब कहॉं हैं?
जहॉं में मेरे सिर्फ़ तू है और तू ही मेरा जहॉं है

उजडे मेरे जहॉं को अब ऐसी बहार दे
बस तेरी जिंदगी से इक दिन उधार दे

तेरे चाहनेवालोंकी तादात न कम हैं लेकिन
मुझसा कोई तुझे चाहे ये भी कहॉं हैं मुमकीन?

गर दिमाग का खलल हैं तो दिल को क्यूं हार दे?
बस तेरी जिंदगी से इक दिन उधार दे