Wednesday, January 23, 2008

बॉलीवूडगिरी भाग २

कंपनी.

रामूचा माझ्यामते सर्वात चांगला सिनेमा. अगदी out-and-out commercial movie (with a khallas item song :) ) असला तरी इतर बर्याच बाबतीत त्याने हॊलीवूडला तोडीस तोड सिनेमा काढला आहे.

मोहनलाल या दक्षिणेतल्या talented actor ने commissioner चं काम जबरदस्त केलंय. शूटिंगच्या सुरू होण्याआधी त्याला हिंदीतलं ओ की ठो कळत नव्हतं. शूटिंग संपता संपता त्याचं हिंदी बरंच सुधारलं. त्यामुळे त्याने रामूला त्याचे सगळे संवाद पुन्हा डब करण्याची गळ घातली. पण रामू कसला भारी. तो म्हणला, ’नको. ते आहेत तसेच राहूदेत. ओरिजिनल वाटतील.’ आणि ते २००% ओरिजिनल वाटतात. ’मलिक साब, मॆ भी चंदू नही हूं’ असं तो जेव्हा शेवटच्या सीनमध्ये म्हणतो तेव्हा जे वाटतं त्याला (दुर्दॆवाने) मी फ़क्त ’लयी भारी’ एवढंच म्हणू शकतो.

मलिकचा प्रतिस्पर्धी आपल्या भावाबरोबर गाडीचं दार उघडून आत जाउन बसतो. पाउस बदाबद कोसळतो आहे. त्यामुळॆ भर दुपारीही अंधार झाला आहे. जणू हा त्याच्या आयुष्याला वेढून टाकणारा काळोखच आहे.
गाडीत बसल्यावर भाउ म्हणतो, ’अब?’
हा उत्तरतो ’अब क्या? या तो मलिक या तो हम.’
’मॆनेभी यही सोचा.’
गाडीच्या मागून येणारा शांत आवाज त्या पावसाच्या गदारोळातही समोरच्याचं काळीज चिरीत जातो. मग मागच्या सीटवर बसलेला मलिक हळूच उजेडात दिसतो. अजयच्या त्या डोळ्यांतला तो थंडगार खुनशीपणा त्या पावसापेक्षा कित्येक जास्त पटीने गारठवतो.

’मलिकभाई मेरेको इसको मारनेका हॆ’ असं चंदू ( नंतरच्या काळात ऎश्वर्यानं याचा अगदी चंदूच करून टाकला :D :D ) जेव्हा एका पोलिस इन्स्पेक्टरसमोर म्हणतो तेव्हा हा थंडपणे तोंडातल्या तोंडात बोलत गणित मांडतो. याला मारलं तर किती बोंबाबोंब होईल, याची बॉडी कुठे टाकायची वगॆरे वगॆरे. इकडे चंदू आणि इन्स्पेक्टर दोघेही बोंबलताहेत. अखेर हा शांतपणे चंदूकडे पाहून म्हणतो ’उडादे.’ एक शब्द. एकच शब्द. पण तिथे अजय सिनेमा खाउन टाकतो. गॅंगस्टर कसा रंगवावा याचा वस्तुपाठच त्याने घालून दिलाय. A don has to be cold. Ajay actually radiates those cruel cold vibes in Company.

पण माझ्यासाठी मात्र कंपनी चा high point चित्रपटाच्या अगदी सुरवातीला आहे. भल्या मोठ्या मुंबईच्या पार्ष्वभूमीवर आकाशात घिरट्या घालणारा ससाणा आणि मागे मकरंद देशपांडेचं opening speech. त्या आवाजातली जादू चित्रपटाच्या सुरवातीसच आपल्याला भारून टाकते. काहीतरी वेगळं (आणि अ-’सत्या’ :) ) सादर होणार असल्याची ती नांदी असते.

जाता जाता , मलिकचा मला सर्वात आवडलेला डायलॉग. ’हर इन्सान के अंदर एक राक्षस होता हॆ.....’


( आमचे आगामी आकर्षण: अंदाज अपना अपना आणि प्रहार. )