Wednesday, December 27, 2006

बिन तेरे क्या जीना?

’गुरु’ ची गाणी ऎकलीत? सही आहेत ना? ( सही नाहीत म्हणलात तरी मला कुठं कळणार आहे? हीच तर मज्जा आहे ब्लॉग ची ! (आणि यानंतर एक टिपिकल चाफ़ेकरी कुत्सित हास्य. तेही हिरड्या दाखवून !!))

हो. मी अभिमानाने सांगतो की मी अट्ट्ल bollywoodबाज आहे. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी Pune Times चं शेवटचं पान काढून ते अधाशासारखं वाचणं हे मी माझं ईतिकर्तव्य समजतो. ( तसं business news आणी sports वाचणारे माझ्याकडे बघून कुत्सितपणे हसतात. but who cares?)

तर चर्चा चालली होती ’गुरु’ च्या गाण्यांची. superb music. मणी रत्नम आणि रेहमान चा आणखी एक मास्टरपीस. The mozart from madras delivers another hit. का कुणास ठाउक पण असं वाटतं की जो रत्नम रेहमान कडून इतकी चांगली गाणी बसवून घेतो (Read : Bombay, Roja, Dil Se, Saathiya, Yuva and Guru) तो या गाण्यांना पडद्यावर न्याय द्यायला थोडासा कमी पडतो. कदाचित असं असेल की त्या संगिताच्या सादरीकरणासाठी तो ७०mm पडदा पण अपूरा पडत असेल. (किंवा ठोकळा आणी माठ factory मधल्या कलाकारांना रत्नम च्या कल्पना झेपत नसतील. असो.)

अगदी नकळत्या वयात ऎकलेली bombay आणी roja ची गाणी. अर्थात त्यावेळी एस. डी. बर्मन पासून विशाल शेखर पर्य़ंत कुणाचीच गाणी ऎकलेली नव्हती. नंतर तीही ऎकली. English music ऎकलेलं नव्हतं. अलीकड्च्या काळात तेही ऎकलं. पण काय कुणास ठाउक, या माणसाचं music अजुनही मनाला भुरळ पाडतं. मान्य की त्याच्यापेक्शा सुद्धा चांगले musicians आहेत. तो repetition करतो. पण मग तरीही ’रंग दे ..’ ची गाणी एवढी का गाजतात? कुछ तो बात है.

आणी हे फ़क्त माझंच म्हणणं नाहीये. TIME Magazine मधे त्याच्यावर जो लेख आला होता त्यातही लेखकाने bombay dreams च्या music ला broadway वरचं या दशकातलं सर्वश्रेष्ठ music म्हणलंय. याहून मोठी पावती काय असू शकते?

दिलिप कुमार उर्फ़ अल्ला रख्खा रेहमान ची खासीयत म्हणजे त्याच्या गाण्यांचं अगम्य lyrics.
मला तर हिंदुस्थानी (टेलिफ़ोन धुन में) आणी हम से हॆ मुकाबला(पट्टी रॅप) ची गाणी अजूनही कळलेली नाहीत.

पण ज्याची हिंदी गाणी समजत नाहीत त्याची boys ची तामिळ आणी तेलगू मधली गाणी तोंडपाठ असलेले (आणी तीही या दोन्ही भाषांमधलं ओ की ठो कळत नसताना :))माझ्यासारखे अनेक वेडे पीर भेटतील. Rhythm of life कॅच केलाय त्याने.

हे परमेश्वरा , लाख लाख धन्यवाद. रेहमान दिलास आणि तो ऐकायला कान दिलेस. आणखी काय हवंय?

आता वाट बघायची ती ’जोधा अकबर’ च्या music release chi.


vive la rehman